औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्याप्रमाणे जुलै महिन्यात देखील कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहेत. १ जुलै पासूनच कोरोनाबाधितांची संख्या प्रतिदिन वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. १ जुलै ते आजपर्यतचा कोरोना रुग्णांच्या अहवालानुसार १ हजार २५१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामध्ये आज सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६८८० वर जाऊन पोहचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज औरंगाबाद मनपा हद्दीतील १०१ तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ८५ पुरूष तर ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण ६८८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ३३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. सध्या ३१९६ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी आज १५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
सहाच दिवसात १२५१ रुग्णांची वाढ
जुलै महिना सुरू होताच १ जुलै ते आज दुपारपर्यंतच्या अहवालानुसार या केवळ सहाच दिवसांत १२५१ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात १ जुलै रोजी २१७, २ जुलै रोजी सर्वाधिक २६१ रुग्णांची दिवसभरात वाढ झाली. तर ३ जुलै रोजी १५७, ४ जुलै रोजी २४९, ५ जुलै रोजी २१७, आणि आज दुपारपर्यंत १५० रुग्णांची नव्याने भर पडली. या सहाच दिवसांत १२५१ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
शहरात १०१ रुग्ण
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार शहरात १०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात घाटी परिसर १, जाधवमंडी ३, अरिष कॉलनी ३, सिडको एन-अकरा ३, दिल्लीगेट १, गजानननगर ४, पुंडलिकनगर १, छावणी २, किराणाचावडी १, एन अकरा हडको १, आदर्श कॉलनी गारखेडा १, नाईकनगर ४, उस्मानपुरा ५, उल्कानगरी २, शिवशंकर कॉलनी ८, एमआयडीसी, चिखलठाणा १, मातोश्रीनगर २, नवजीवन कॉलनी १, श्रध्दा कॉलनी १, एन-सहा १, एन-दोन सिडको, ठाकरेनगर १, जटवाडा रोड १, पोलिस कॉलनी २, दशमेशनगर ७, वेदांतनगर १, टिळकनगर १, एन-नऊ सिडको १, प्रगती कॉलनी १, देवळाई, सातारा परिसर २, जयभवानीनगर ३, अंबिकानगर १, गजानन कॉलनी ३, पद्मपुरा १५, सिंधी कॉलनी १, पडेगाव २, सिल्क मिल कॉलनी ४, रेल्वे स्टेशन परिसर ४, टिव्ही सेंटर ४, इतर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातील ४९ रुग्ण
ग्रामीण भागात आज ४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात विहामांडवा १, सिध्देश्वरनगर, सुरेवाडी १, कारंजा १, वाळुज १, हिरापुर सुंदरवाडी ३, स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर २, सावरकर कॉलनी, बजाजनगर २, वडगांव बजाजनगर २, निलकमल सोसायटी, बजाजनगर ४, साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर ५, साऊथ सिटी, बजाजनगर १, दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी १, सायली सोसायटी बजाजनगर ३, शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी २, जिजामाता सोसायटी बजाजनगर ३ पंचगंगा सोसायटी बजाजनगर १, विश्व विजय सोसायटी बजाजनगर २, डेमनी वाहेगांव ३, पैठण ३, इंदिरानगर, वैजापुर ५, अजिंठा २, शिवणा १ याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.












